गणेश विसर्जनादरम्यान तीन मुले गेली वाहून
पांढरकवडा : येथील खुनी नदीवरील महादेव घाटावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना अचानक नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन मुले वाहून गेली, तर तीन मुले पोहून निघाल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना सोमवारी (ता. 24) रात्री दहाच्या सुमारास घडली. शुभम गेडाम, पृथ्वीराज पेंदोर व नितीन गेडाम अशी मृतांची नावे आहेत. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी यवतमाळवरून रेस्क्यू टीम घटनास्थळावर मंगळवारी (ता. 25) सकाळी दहाला पोहोचली आहे.
गेल्या पंधरवड्यात येथील तीन मुलांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती तोच आजची ही दुर्दैवी घटना घडली. गणेश मंडळांची मुले नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. दरम्यान, वरच्या बाजूने खूप पाऊस पडला व धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आहे. त्यामुळे अचानक पाण्याचा वेग वाढला व नदीपात्रात उभी असलेली तीन मुले वाहून गेली. तर, तिघे पोहून बाहेर निघाली असून ते सुखरूप आहेत. रात्री साडेकरापर्यंत पोलिस व भोई बांधव त्या मुलांचा शोध घेत होते. तोपर्यंत एकाचाही मृतदेह सापडला नव्हता. गावात या घटनेने शोक व्यक्त केला जात आहे. आज सकाळपासून मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य सुरू झाले असून दहा लोकांची चमू कार्य करीत आहे. त्यांनी गोताखोर व बोटीने शोध घेणे सुरू केले आहे. घटनास्थळावर नागरीकानी मोठी गर्दी केली आहे. स्थानिक पोलिस त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दोन घटनांमध्ये पाच मुलांचा मृत्यू
गणेश विसर्जनादरम्यान काल सकाळी राळेगाव तालुक्यातील कापशी येथील घाटावर दोन मुले वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर कालरात्री पंधरकवड्यात ही दुसरी घटना घडली. यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात
