Horrar Mystery
लेखक:मिलिंद दांडेकर ( Source : Facebook/Horror story's)
(सैतानासोबत करार हा पाश्चिमात्य लोककथांमधला एक प्रकार आहे. माणसाला आपल्या आयुष्यात नाव पैसा प्रसिद्धी हवी असते. काही लोकांना ती मिळते तर बहुतांश लोकांना ती मिळत नाही. पण ती मिळविण्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात.सदर कथा ही त्याच गाजलेल्या 10 कथांमधील एक कथा आहे ज्यामध्ये त्यांना प्रसिद्धी आणि पैसा तर मिळाला पण त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली)
रॉबर्ट जॉनसन हे एक ख्यातनाम अमेरिकन ब्लू संगीतकार होऊन गेले. "रोलिंग स्टोन्स" हे त्याकाळच्या संगीताचे मानक ठरवणाऱ्या सूचीमध्ये त्यांना 100 पैकी 5 वे स्थान मिळाले होते. त्याकाळची एक दंतकथा असे सांगते की त्यांना गिटार मुळीच वाजवता यायची नाही पण त्यावर(गिटार) वर प्रभुत्व मिळवायची त्यांची प्रबळ इच्छा होती. म्हणून ते एका मंत्रिकाकडे गेले.तर त्या मांत्रिकाने त्यांना असे सांगितले की सैतान त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकतो. त्यासाठी त्यांना मध्य रात्र आणि प्रातःकाळ ह्याच्या मधल्या काळात चार रस्ते जिथे एकत्र येतात तेथे जाऊन गिटार वाजवावी लागेल आणि सैतानाचे आव्हान करावे लागेल. त्याप्रमाणे सांगितलेल्या वेळेवर प्रसिद्धी साठी हापापलेले जॉन्सन तेथे गेले आणि गिटार वाजवून सैतानाचे आव्हान केले. थोडा वेळ गिटार वाजवल्यावर त्यांना असे दिसले की त्यांच्या उजव्या बाजूने धुक्यामधुन एक आकृती त्यांच्याकडे येत होती थोडं जवळ आल्यावर त्यांनी निरखून पाहिले असता दिसले की तो एक काळा उंच आणि धिप्पाड माणुस होता. तो त्यांच्या जवळ आला आणि त्याला बोलला,”तू ज्याचे आव्हान करीत होतास तो मीच आहे. बोल तुला काय हवे आहे माझ्याकडून?” जॉन्सन ने वेळ न दवडता त्यास म्हटले की मला गिटार वाजवण्यात पारंगत व्हायचे आहे. असे बनायचे आहे की इतिहासात माझे नाव आदराने घेतल्या जाईल. एकदम शांतता पसरली.तो काळा माणूस बोलला की तसे होईल अगदी बिनदिक्कत पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते मी जर का तुझे हे काम करून दिले, तर त्या बदल्यास मला काय मिळेल? जॉन्सन ने क्षणात म्हटले की त्या बदल्यास मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे. अगदी आपली आत्मा ही विकायला तयार आहे. हे त्याने म्हणायचंच बाकी होत की त्या धिप्पाड माणसाने जॉन्सन च्या हातातील गिटार ओढुन त्याच्या हातात घेतली आणि ती वाजवण्यास सुरुवात केली. अतिशय सुमधुर आणि श्रवणीय सूर त्या गिटार मधून बाहेर पडु लागले.ते सूर इतके सुंदर होते की ह्यापूर्वी त्यानी कधीही ते ऐकले नव्हते. ते ह्या पृथ्वी वरचे वाटतच नव्हते. थोडा वेळ वाजवल्यावर तो माणुस त्याला बोलला की आता तू जगातला एक सर्वश्रेष्ठ असा गिटार वादक झाला आहेस. ही गिटार हातात पकडल्यावर ह्यातून अतिशय सुमधुर असे सूर बाहेर पडतील.असे म्हणत ती गिटार त्याने जॉन्सन च्या हातात दिली.आणि तिथून तो जाऊ लागला.. जाता जाता तो एवढेच बोलला की “आपल वचन तुला ठाऊक आहे न? मला जे हवं आहे ते घायला मी योग्य वेळी येईनच.” असे म्हणत तो विरळ हवेत अदृश्य झाला. आणि हे खरं आहे की, त्या दिवसानंतर जॉन्सन ख्यातनाम असा गिटार वादक झाला. ह्याला कारणीभूत तो करार असेलही कदाचित पण एकेकाळी साधं गिटार ही हातात नीट न पकडता येणारा माणूस जगविख्यात असा वादक झाला. . वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी जगप्रसिद्ध असे 6 रेकॉर्ड तयार केले. जॉन्सनचा मृत्यू हा विवादास्पद आहे कारण तो विवाहित स्त्रियाशी लगट करण्याबाबत कुप्रसिद्ध होता. वयाच्या 27 व्या वर्षी तो मेला.त्याच्या मृत्यू चं कारण काय होतं हे अजूनही सिद्ध झालं नाही आहे.कोणी म्हणत की तो ज्या स्त्रियांशी लगट करायचा त्यामधीलच एकीच्या नवऱ्याने त्याला व्हिस्की मधून विष पाजले. तर कोणी म्हणत की तो हृदय विकाराने गेला. त्याच्या शेवटच्या क्षणी त्याला पाहणारे लोक म्हणतात की तो त्याच्या मृत्यू समयी जमिनीवर गडाबडा लोळत होता आणि कुत्रा जशी आपली जीभ बाहेर काढतो त्याप्रमाणे आपली जीभ बाहेर काढत होता.कारण काहीही असो, जॉन्सन कमी वयातच हे जग सोडून गेला आणि आपल्या मागे ठेऊन गेला तो रेकॉर्ड चा खजाना जे ऐकून आजही लोकं मंत्रमुग्ध होतात.